.
"एवढ्या पावसात निघालीयेस ?" मागून आवाज आला . "हो अगं , नंतर खूप ट्राफिक होईल " मी म्हंटलं आणि ऑफिस च्या लिफ्ट मध्ये शिरता शिरता bye पण केलं . पळत पळत car गाठली आणि परतीचा रस्ता धरला .. पाऊस नुसता कोसळत होता ... अविरत प्रतीक्षा करणाऱया धरणी ला तृप्त करत होता . . रस्त्यावर एवढी गर्दी नव्हती.. बहुतेक सगळे पाऊस थांबायची वाट बघत होते. . मला पावसाचा आवाज खूप आवडतो.. एक लय असते. . एकाच तालात चालू असलेला ठेका. .
रस्त्याच्या बाजूला एक भुट्टा वाला होता . . त्याच्याकडे ४/५ लोकांचा जमाव होता . . एक मन वाटलं. . थांबावं का ? किती दिवस झालें . . पावसात भुट्टा नाही खाल्ला. . पण घरचा विचार आला. . आणि मनाला आवरलं . . सिग्नल लागला . . शेजारी एक pulsar bike दिसली . . एक couple होतं . . नवीन प्रेमात पडलेले. . अगदी कोणी पण ओळखेल. . त्या मुलीने त्याला घट्ट पकडलं होतं . . जणू तो तिला कोसळणाऱ्या पावसा पासून वाचवणार होता. . त्या मुलाचा एक हात तिच्या हातात आणि एक हात bike वर . . मी गालात हसले . . पहिल्या प्रेमाची आठवण झाली . . आणि मन भूतकाळात धावायला लागलं . . एखाद्या चित्रपटा प्रमाणे त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक पावसाळा डोळ्या समोरून जात होता. .
माझा आणि त्याचा पाऊस किती वेगळा होता. . आमच्या प्रेमाची सुरुवात march मध्ये झाली . . गप्पांच्या ओघात जेव्हा जेव्हा पावसाचा विषय निघायचा तेव्हा मी भरभरून बोलायचे. . म्हणायचे - मला पावसात भिजायला प्रचंड आवडतं . . मला तर वाटत पाऊस माझ्यासाठीच पडतो. . तो हसायचा . . म्हणायचा हा . . फक्त तुझ्याचसाठी पडला असता तर बरे झाले असते. . मला हा चिखल, राडा अजिबात आवडत नाही जेव्हा bike वरून १० km college ला यावं लागतं ना , assignment , mobile , ipod सगळं सांभाळत तेव्हा कळत . .
एक दिवस आम्ही असेच MIT च्या कट्ट्यावर बसलो होतो . . हवा सुटलेली . . पावसाची चाहूल लागली . . तो म्हणाला. . चल bike वर बस . . मी मनातल्या मनात म्हटलं . . किती unromantic आहे हा. . मला घरी सोडून चालला पाऊस आला म्हणून. . bike सुसाट चालली होती . . माझं मन पावसाच्या विचारात. . भानावर आले तेव्हा कळलं . . माझं घर तर मागेच राहील . . मी विचारलं . . "कुठे चाललोय आपण" तो म्हटला . . "तुझा पाऊस enjoy करायला " . . मी त्याला घट्ट मिठी मारली . . एव्हाना जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली होती . . त्याने NDA रोड गाठला. . bike slow केली . .एका हाताने माझा हात धरला आणि म्हणाला . . "आपला पहिला पाऊस" ! किती romantic होतं ते सगळं . . आम्ही पावसात NDA रोड वर ३ फेऱ्या घातल्या . . नंतर गरम गरम भुट्टा खाल्ला आणि शेवट झाला तो ccd त mochachhino ने . . किती अविस्मरणीय दिवस होता . .
एकदा college बंक करून आम्ही लोणावळा गाठलं . . एका हिरव्यागार टेकडी वर स्वतःची जागा शोधून आम्ही निसर्ग एंजॉय करत होतो. . खाली उतरलेले ढग, मधून मधून पावसाची रिमझिम , भुशी डॅम , कॉर्न , चहा सगळं मस्त एंजॉय करून परतीचा रस्ता धरला . . highway वर ट्रॅफिक होतं . . सगळे पावसाळा एंजॉय करत होते . . अचानक एका टर्न वर bike थोडी off-balance झाली . . मी घट्ट त्याला पकडलं . . थोडंसं पुढे गेलयावर त्याने bike side ला घेतली. . स्वतःचं हेलमेट काढून माझ्या डोक्यावर घातलं आणि म्हणाला - "highway वर तरी हेल्मेट घातलं पाहिजे ना. ." मी काहीच बोलले नाही . . एक गोष्ट मात्र जाणवली. . स्वतःपेक्षा माझी काळजी घेणारा "तो" माझ्या आयुष्यात आहे . . मी पण जपेन त्याला आयुष्यभर . .
Professional life चं पहिलं वर्ष . meetings , work pressure , deadlines या सगळ्याला adjust होत होते . अशाच एका दिवशी आपापली कामं आटपून भेटलो आम्ही . . अचानक पाऊस सुरू झाला . .candle light dinner चा बेत ही फसला . . . . मला तो म्हणाला आज फक्त माझ्याबरोबर चल .. त्याने apache गाठलं . . आम्ही आत गेलो आणि त्याने ऑर्डर दिली . . २ antiquity large . . मी त्याला म्हटलं . . "झेपेल का मला " ? तो म्हटला "मी आहे ना ". . म्हणजे आत्ता पर्यंत मी फक्त टेस्ट केलं होतं आणि खरं सांगायचं तर मला काही कधी आवडलं नाही . . आमचे पेग आले . . तो म्हटला . . पावसात whiskey प्यायची मजाच और असते . . cheers ! मी भीत भीत पेग तोंडाला लावला आणि जे काही होता ते मला आवडलं . मागे गाणं सुरू होतं . . तो अगदी डोळे बंद करून साद देत होता .. .
To lay it on the line
I could rest my head
Just knowing that you were mine
All mine
So if you want to love me
Then darling don't refrain
Or I'll just end up walking
In the cold November rain
मी त्याला कडेवर घेतलं . . त्याचा गोड पापा घेतला . . आणि छतावरून ओघळणाऱ्या पाण्याचे काही थेंब त्याच्या अंगावर उडवले. . एवढ्यात मागून तो आला आणि आम्हा दोघांना ओढत पावसात घेऊन गेला. . म्हणाला - "ही आहे खरी पावसाची मजा ". . आम्ही तिघे पावसात मनसोक्त भिजलो . .
आता ना पाऊस "त्याचा" होता ना "माझा ". . तो सर्वार्थाने "आमचा" झाला होता. .



