Tuesday, February 21, 2012

झुळूक

कुठून तरी आज अचानक एक झुळूक आली...
पाठोपाठ तिच्याबरोबर मलाही ती घेऊन गेली...
कुठेही नाही थांबा तिचा कुठेही नाही विसावा...
तिच्याबरोबर मी हि जात होते दूर दूर गावा..........

        हवेबरोबर खेळत होते, जमीनीवरही आपटत होते...
        थोडे वाऱ्यावर उंच जाऊन परत मातीमध्ये मिसळत होते...
        दूरवर नजर फेकली आणि बरेच वाटसरू दिसले..
        काही चेहरे अनोळखी तर काही ओळखीचे भाव दिसले....

कोणी थांबवून घेतलं मला, कोणाला मी थांबवलं...
थोड्याशा गप्पा मारल्या पण लगेचच मनाला आवरलं...
अहो प्रवास मोठं होता आणि वाट खडतर होती...
एकटीनेच सारा प्रवास करायचा अशी अजब अट होती....

        आता तरी माझं गाव आलं असं वाटायचं मनात....
        पण मात्र होता तो केवळ मृगजळाचा आभास
        बरीच वादळ आली आणि उन्हातूनही चालले...
        अभिमान वाटतो मला मी सगळ्यातून सावरले...

मधेच एखाद्या सुंदर फुलाच्या सहवासात मी राहिले...
विसरून गेले उन पाऊस फक्त त्याच्यासाठी जगले
थोडे थोडे माझे क्षण असे सगळ्यांनीच वाटून घेतले...
बरयाच काळानंतर लक्षात आलं आता माझ्या ओंजळीत काहीच नाही उरले...

         निराश मनाने रिकाम्या ओंजळीकडे पाहत परत फुलांच्या आशेने पुढे जात राहिले...
         पण आता मात्र वाटेवर कोणीच नाही भेटले...
         स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी, कोणाशी तरी बोलण्यासाठी खूप वेळ एकटीच चालत राहिले...
        पण हेच कळले नाही....
        की ही धडपड करताना मी कधी आसमंतात विलीन झाले,,,,,