Sunday, September 16, 2012

Engineering हे engineering असतं

Welcome to the magical.. mesmerizing world of Engineering.. :D
MARLISH(मराठी  + English) कविता  dedicated to all engineers... !!!



Engineering हे engineering असतं...
५०% manipulation आणि ५०% learning असतं..
minimum चार वर्षांसाठी तरी college मध्ये रहायचं असतं ...
म्हणूनच engineering हे engineering असतं ....

वर्षाच्या सुरुवातीला सगळी lectures attend करायचा निर्धार असतो..
पण ऐन वेळेस कधी cricket match , कधी birthday party तर कधी picture चा पहिला  show टपकतो..
मग काय, lectures bunk होणं अगदी अपरिहार्य असतं...
engineering म्हणजे engineering असतं ....

वेगवेगळ्या competitions , canteen , ठरलेले कट्टे यांचा भारी fascination असतं..
तीन महिने असे मजेत गेले की चौथ्या महिन्यात submission असतं.. :(

submission च्या वेळी रात्री जागून काढायच्या असतात..
गाणी ऐकता ऐकता sheets ही काढायची असतात...
दुसऱ्या दिवशी college ला proxy नक्की असते..
अहो ज्या दिवशी आम्हाला कळत...त्याच्या दुसऱ्या दिवशी assignment submission असतं..
म्हणूनच engineering हे engineering असतं ....

PL आली की मग भलतंच tension येतं..
orals , practs चा अभ्यास करायचा की theory समजून घ्यायची यात मोठं confusion  असतं...

शेवटच्या दिवसात JIGAR ची पुस्तकं आणि notes च्या xerox वाचण convention असतं...
first क्लास वगैरे नाही तर कधी ४०% मार्कांवरही satisfaction असतं...
म्हणूनच engineering हे engineering असतं ....

engineering म्हणजे एक ऐट असते..
आकांक्षाना दिलेली उंच भरारी असते..
कल्पनेच्या train ला मिळालेला platform असतो...
Imagination ला perfection बनवण्याचा attempt असतो..
engineering  म्हणजे आरामाला good bye म्हणायचं असतं..
म्हणूनच engineering हे engineering असतं ....
engineering हे engineering असतं ....